राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी मोहीम ; शहरातील शालेय संस्थांना शुल्ककपातीसाठी निवेदन

पुणे : कोरोना महामारीसारख्या कठीण काळात अनेक पालकांचे उपजीविकांचे साधन बंद होत असताना, जिथे त्यांच्या एक वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे तिथे केवळ फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात येत आहे. कोरोना संकट काळात शाळा बंद असतानाही काही शाळांनी पालकांकडून फी वसूल करण्याचा तगादा लावला असल्याचे निदर्शनास आले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यमातून सुरू असलेल्या #एक_पाऊल_विद्यार्थ्यांसाठी या मोहिमेअंतर्गत पुणे शहरातील शालेय संस्थांची भेट घेऊन निवेदन दिले आणि विनंती केली.
१. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचा मान ठेवत सर्व शिक्षण संस्थांनी आपल्या शिक्षण शुल्कात ( Tuition Fee) सरसकट कपात करावी. त्याचबरोबर विदयार्थी ज्या सुविधा वापरत नाहीत (Library, Laboratory, Internet, Development, Gymkhana, Education Tour, Annual Functions, etc.) त्याचे शुल्क आकारू नये.
२. ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे शुल्क राहिले असेल त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षे पासून अथवा शिक्षणापासून वंचित ठेवू नये. तसेच त्याला महाविद्यालय सोडण्यास भाग पाडू नये.
३. मुलांचे Online शिक्षण बंद केले जाऊ नये.

राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाने आणि महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सनी मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुभम माताळे यांच्या नेतृत्वात शहरातील शालेय संस्थेला राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी पुणे शहर उपाध्यक्ष श्रीकांत बालघरे, पुणे शहर सरचिटणीस ऋषिकेश कडू, आनंद मोकर हे उपस्थित होते.
शिक्षण हा मूलभूत अधिकार असुन तो प्रत्येकाला मिळायलाच हवा वर नमूद मागण्यांचा आपण अतिशय गांभीर्याने विचार करावा ही नम्र विनंती. याबाबत आम्हाला मुलांच्या शिक्षणाबाबत कोणत्याही प्रकाचे राजकारण करायचे नसुन कोणत्याही संस्थेच्या संबंधात काही तक्रार आम्हाला प्राप्त झाल्यास आपल्या विरोधात नाईलाजाने आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल.



