सर्वपक्षीय गटनेत्यांना विश्वासात घेऊनही विरोधकांचे आंदोलन- महापौर मोहोळ

पुणे : पुणे महानगरपालिकेत आज भाजप पक्षाने शासनाचे नियम धुडकावत ऑनलाइन पद्धतीने सर्वसाधारण सभा घेतल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत घेत विरोधकांचे आंदोलन हे केवळ स्टंटबाजी असल्याचे सांगितले.
महापौर मोहोळ म्हणाले विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौर दालनात गोंधळ घालत जे वर्तन केले ते चुकीचे होते. ऑनलाईन जीबीसाठी सर्वपक्षीय गटनेत्यांनी विश्वासात घेतले होते. परंतु अचानक महापौर दालनात येऊन घातलेला गोंधळ हा विरोधी पक्षांचा दुटप्पीपणा आहे.

आम्हाला प्रामाणिकपणे जीबी चालवायची आहे.त्यामुळे आजची खास जीबीची जाहिरात व अन्य तांत्रिक प्रक्रिया केल्यामुळे ऑनलाईन जीबी घेतली गेली. त्यामुळे यापुढे राज्य नगर विकास विभागाकडून ऑफलाईन जीबी घेण्याचे आदेश येत नाहीत तोपर्यंत आम्ही ऑनलाईन जीबी घेणार आहोत.



