पुणे शहर

नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

एकता प्रतिष्ठानचा उपक्रम

पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एकता प्रतिष्ठानकडून गुलटेकडी येथील गिरीधर भवन चौक परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एकता प्रतिष्ठान महिला अध्यक्ष स्वाती शेरला,  गणेश शेरला, सुयोंग ग्रुपचे नितीन शहा, शिवराज भाले, हरीष परदेशी, बाळासाहेब शेलार, सचिन खंडागळे, मनोज कांबळे, विनायक कडवळे आदी उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना भिमाले म्हणाले की, “कोरोनाच्या भीतीमुळे शहरात रक्ताचा तुडवडा वाढला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. रक्तदान म्हणजेच खरे जीवनदान आहे.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय साठे, अविनाश सर्वेगोड, अजय शिंदे, नझीर शेख, महेश सांळूखे, जयंत पानसकर, हेमंत जगताप, रूपेश राजभर, अक्षय मदणे यांनी नियोजन केले होते. कार्यक्रमाचे संयोजक गणेश शेरला यांनी आभार व्यक्त केले.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 00 pm
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 35 pm

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये