राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक जनजागृती अभियान व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन..

पुणे : भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक जनजागृती अभियान व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी डॉ. जोशी, कोथरुड महिला मोर्चा उपाध्यक्षा सुप्रिया माझिरे , किशोर चांदारकर उपस्थिती होते. पुणे शहर अध्यक्ष कैलास माझिरे यांनी या ग्राहक जनजागृती अभियानाचे नियोजन केले होते.

यावेळी ग्राहकाचे हक्क, सुरक्षितता, तक्रार तसेच ते निवारण करण्याचे अधिकार या गोष्टीची माहिती देण्यात आली. या प्रसंगी पुणे जिल्हा उपाध्यक्ष भुपेश शुक्ला, महिला शहर अध्यक्ष ज्योत्स्ना राजोपाध्ये, अमित साळुंके, महेश भायगुडे, तुषार कुऱ्हाडे, प्रशांत बलकवडे उपस्थित होते.



