पुणे शहर

शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आजपासून २५ जूनपर्यंत ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन..

वारजे : कोरोना काळात शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी २१  जून योग दिनाचे औचित्य साधून “योग सर्वांसाठी, योग प्राणायाम” शिबिराचे आयोजन १७ ते २५ जून दरम्यान ऑनलाईन पद्धतीने विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. Organizing online yoga camps to boost the body’s immune system.

या शिबिरात
•प्रतिकारशक्ती वाढवणारी आसने
•मानसिक स्थिरता प्रदान करणारे ध्यान व ओंकार साधना निरोगी फुप्फुसांसाठी आसने
•प्राणायामचे साधी सोपी आसने
•शारीरिक क्षमता वाढविणारे आसने
• मानसिक क्षमता वाढविणारे ध्यान व ओंकार साधना
•फुप्फुसांची कार्यक्षमता वाढवणाटी असने
शिकवली जाणार आहेत.

आरोग्यम् योग चिकित्सा केंद्राच्या आरुशी दिनेश शिंगोटे यांच्या माध्यमातून हे शिबिर घेतले जाणार आहे. कोरोना झालेले आणि कोरोना मधुन मुक्त झाले आहेत त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त शिबिर असल्याचे बाबा धुमाळ यांनी सांगितले. १७ ते २५ जून दरम्यान सायंकाळी 6 ते 7 पर्यंत  Google Duo वर हे शिबिर असणार आहे.
साहिल धुमाळ +91 97661 64212
सुजित चोटगे +91 78756 86168

Img 20210522 wa0203

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये