पुणे शहर

येरवडा जेलमध्ये राडा, १२ कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण

पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या न्यायाधीन कैद्यांच्या टोळीने तुरुंग अधिकाऱ्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. काही कैद्यांनी कार्यालयातील खुर्ची उचलून अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पण बराकीतील इतर कैद्यांनी रोखले. कैद्यांच्या मारहाणीत अधिकाऱ्याच्या डोळ्याला इजा झाली असून डाव्या हाताचा मनगट फ्रॅक्चर झाले आहे. तुरुंग अधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याने कैद्यांनी मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मारहाण करणारे कैदी आंदेकर टोळीचे सदस्य असल्याचे समजते.

Img 20240202 wa00032332203558256672939

शेरखान पठाण असे कैद्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या तुरुंग अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी विकी बाळासाहेब कांबळे, प्रकाश विठ्ठल रेणुसे आणि इतर दहा कैद्यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,” काही महिन्यांपूर्वी तुरुंग अधिकारी शेरखान पठाण यांची येरवडा कारागृहात बदली झाली आहे. सर्कल १ मध्ये पठाण नियुक्तीला आहेत. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे कारागृहातील सर्कल १ मध्ये कर्तव्य बजावत असताना न्यायाधीन कैदी कांबळे आणि रेणुसे यांच्याशी काही कारणावरून वादावादी झाली.

Screenshot 2024 02 08 13 58 58 104172624598441830192

त्याचा राग आल्याने कांबळे आणि रेणुसे यांनी तुरुंग अधिकारी पठाण यांच्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की सुरू केली. त्यामुळे पठाण यांनीही दोघा कैद्यांना मारहाण करू लागल्यावर त्यांचे दहा साथीदार पुढे सरसावत पठाण यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली. यावेळी एकाने शेजारील कार्यालयात जाऊन लाकडाची खुर्ची उचलून आणून पठाण यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. पण सर्कल मधील काही कैद्यांनी खुर्ची मारणाऱ्या कैद्याला वेळीच रोखल्याने मोठी दुर्घटना टळली.

कैद्यांच्या अमानुष मारहाणीत अधिकाऱ्याच्या डोळ्याला इजा झाली असून डावा हाताचा मनगट फ्रॅक्चर झाले आहे. तुरुंग अधिकाऱ्याला कैद्यांनी मारहाण केल्याने कारागृहात मोठी खळबळ माजली आहे. प्रशासनाने तात्काळ मोठा फौजफाटा तैनात केला असून मारहाण करणाऱ्या कैद्यांना वेगवेगळ्या सर्कलमध्ये बराकीत बंद केले आहे. येरवडा पोलीस कारागृहात जाऊन मारहाणीची सविस्तर माहिती घेत आहेत.

Img 20240202 wa00026664518766032457834

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये