पुणे शहर

शासनाला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या विभागाच्या कार्यालयांची दुरावस्था

पुणे : एका खरेदी खताच्या नोंदणीच्या निमित्ताने पुणे शहरातील कर्वेनगर मधील काकडे प्लाझा येथील कार्यालयात जाण्याचा योग आला. तेथील दुरावस्था बघून सामान्य नागरिकांच्या प्रती शासन किती असंवेदनशील असू शकते आणि शासनाच्या बेफिकिर कारभाराचा संताप आला. हि दुरावस्था तातडीने दूर करण्यात यावी. अशी मागणी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

खर्डेकर म्हणाले, तेथील दुरावस्था पाहून शहाण्याने नोंदणी व मुद्रांक विभागाची पायरी चढू नये व शासनाला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या विभागाच्या कार्यालयांची दुरावस्था झाली असून कधी साहेब व्हिजिटला तर कधी सर्व्हर डाऊन, अतिशय गर्दीच्या जागेत कार्यालय, आलेल्या नागरिकांना ज्यात महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसह आलेल्या भगिनी अश्यांना बसायला देखील जागा नाही, एकच बाकडे आणि तब्बल 100/200 नागरिक उभे, ना पाण्याची सोय ना बसण्याची. येथे सर्वत्र अडगळ आणि महत्वाचे म्हणजे नागरिकांची सनदचे दोन फलक, यातला कोणता कालावधी पकडायचा हे गुलदस्त्यातच असते.

ज्या खात्यातून सर्वाधिक महसूल उत्पन्न मिळते त्याच्या कार्यालयांची कमी अधिक प्रमाणात अशीच अवस्था असल्याचे तेथे थांबलेले नागरिक व वकील मंडळी सांगत होती. ही स्थिती कधी सुधारणार असा सवाल संदीप खर्डेकर यांनी विचारला असून लवकरच ह्या विषयावर आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Img 20220123 wa0404
Img 20211231 wa00066164473394770712000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये