महापालिकेच्या मिळकतकरामध्ये सवलत देऊन मिळकतकर भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची पृथ्वीराज सुतार यांची मागणी

पुणे : पुणे शहरासह संपूर्ण देशभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून, अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे शहरामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून,नागरिकांना खर्चाची तरतूद करताना कसरत करावी लागत आहे.तरी पुणे शहरातील नागरिकांसाठी मनपाचा मिळकत कर भरण्यासाठी ३१ मे २०२१ ऐवजी जुलै २०२१ अखेर पर्यंतची मुदतवाढ देण्यात यावी व या तारखेपर्यंत संपूर्ण कर भरणाचास मिळकतकरामध्ये सवलत सुध्दा देण्यात यावी. अशी मागणी शिवसेनेने गटनेते पृथ्वीराज सुतार आणि नगरसेवक विशाल धनावडे यांनी पुणे महापालिकेकडे केली आहे.

सुतार म्हणाले, सध्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामूळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थिती मध्ये नागरीकांना खर्चाचे नियोजन करताना मोठा त्रास होतो आहे. त्यामूळे महापालिकेने यावर उपाययोजना म्हणून मिळकत करामध्ये सवलत देऊन मिळकत कर भरण्यासाठी ३१ मे ऐवजी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ द्यावी. त्यामूळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.



