महाराष्ट्र
तिसरी लाट आली, आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर : वडेट्टीवार

मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहोत असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
“तिसरी लाट आली आहे. महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात रुग्ण वाढले आहेत. लॉकडाऊन लागले तर शाळा, मुंबई लोकल अशा अनेक सेवांबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यात सध्या लॉकडाऊनची स्थिती येत आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढला आहे. तिसरी लाट आली आहे. राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारीत विस्फोटक परिस्थिती राहील. रुग्णवाढ पाहिली तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही,” असे विजय वडेट्टिवार म्हणाले. लॉकडाऊनची वेळ आलीच तर ट्रेन, लोकल आणि इतर सुविधांवर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारादेखील त्यांनी दिला.




