पुणे शहर
पुण्यात संजय राऊत यांच्या निषेधार्थ भाजप ओबीसी मोर्चाकडून आंदोलन

पुणे : “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांच्याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षाच्या मुखपत्र असलेल्या सामनामध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी तुलना करून अपमान केल्याबदल सारसबाग येथे भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी सरचिटणीस विनोद मोहिते, दीपक माने, संतोष शिंदे , दिनेश नायकु, कोथरूड मंडळ अध्यक्ष रमेश चव्हाण, चिटणीस भीमराव देवकाते, विकी ढोले,जोशी प्रतीक, प्रसाद लाळगे उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याशी ममता बॅनर्जी यांची तुलना करण्याचा प्रकार अतिशय निषेधार्ह आहे. आम्ही या कृतीचा तीव्र निषेध करीत आहोत. तसेच या प्रकरणी संजय राऊत यांनी तातडीने माफी मागावी. अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही यावेळी देण्यात आला.



