महाराष्ट्र

अखेर तो शासन निर्णय अजित पवार यांच्याकडून रद्द..

मुंबई : उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मीडिया संभाळण्यासाठी बाह्य यंत्रणा नियुक्त करण्याची कसलीच गरज नसल्याचे सांगत यासंदर्भात घेण्यात आलेला शासन निर्णय रद्द करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. Finally, the ruling was canceled by Ajit Pawar.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र समाज माध्यम यंत्रणा नियुक्त करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला होता. या कामासाठी ६ कोटी रुपयांचा निधी बाजूला ठेवण्यात येणार होता. त्यामुळे या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. परंतु अजित पवार यांनी हा निर्णय रद्द करण्याचे आदेश आज दिले आहेत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून ही जबाबदारी पार पाडली जाणे शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समाज माध्यमांची जबाबदारी बाह्य यंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. सद्यपरिस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारे नागरिकांशी व प्रसार माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Fb img 1620720024574
Img 20210508 wa0294

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये