पुणे शहर

चांदणी चौकात निदर्शने करत राष्ट्रवादीकडून भारत बंदला पाठिंबा

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या विरोधात धरणे आंदोलन

कोथरुड : दिल्ली येथे कृषी विधेयकाच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला कोथरुड परिसरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या बंदला पाठींबा देण्यासाठी चांदणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करत कृषी विधेयकाला विरोध दर्शवण्यात आला.

यावेळी पुणे महानगरपालिकेतील माजी सभागृह शंकर केमसे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विजय डाकले यांची भाषणे झाली. याप्रसंगी राजेंद्र पवार, कुणाल वेडे पाटील, राकेश मारणे, सचिन डाकले, निलेश माझिरे , किर्ती पानसरे, राजेंद्र वेडे, श्रीकांत बालघरे, अमर सुतार व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत कृषी विधेयकाला विरोध दर्शवला. आज सकाळ पासूनच बंदला कसा प्रतिसाद मिळणार याबाबत उत्सुकता होती. बहुतांशी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत बंद पाळला.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 00 pm
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये