पुणे शहर

डॉ.प्रमोद चौधरी यांचे जैव इंधन क्षेत्रातील कार्य अभिमानास्पद – चंद्रकांत पाटील

पुणे : प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी यांचे जैव इंधन क्षेत्रातील कार्य अभिमानास्पद असून त्यांना सन्मानित करताना मनस्वी आनंद होत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.इथेनॉल निर्मिती सह जैव आधारित अर्थव्यवस्था स्थापन करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रमोद चौधरी यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

नुकतेच त्यांना प्रतिष्ठेच्या जॉर्ज कार्व्हर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील बायोटेक्नॉलॉजी इनोव्हेशन ऑर्गनायझेशन ( बायो ) ने सन्मानित केलेले ते पहिले भारतीय व दुसरे आशियाई व्यक्ती आहेत.याबद्दल त्यांचा सत्कार करण्यासाठी व ते करत असलेल्या कार्याची विस्तृत माहिती घेण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भेट घेतली.

Img 20210116 wa0007

यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी,भाजप प्रवक्ता संदीप खर्डेकर,कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,प्राज चे डॉ.रवींद्र उटगीकर,विनायक केळकर,अमोल मुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी पुणेरी पगडी,शाल व गुच्छ देउन चंद्रकांतदादांनी त्यांचा सन्मान केला तर  माधव भांडारी यांनी स्वतः लिहिलेले अयोध्या हे पुस्तक भेट दिले.डॉ.प्रमोद चौधरी यांनी यावेळी उरवडे येथील अद्ययावत प्रयोगशाळेत सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली / यात प्रामुख्याने टाकाऊ शेतमालापासून बायोगॅस व इथेनॉल निर्मिती वर सुरु असलेले संशोधन जैव इंधन क्षेत्रातील क्रांती ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Img 20210128 wa0172

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये