चांदणी चौक परिसरातील नागरिकांच्या सोयीचे सेवा रस्ते ताबडतोब करा ; अन्यथा रास्ता रोको आंदोलन : दिलीप वेडेपाटील

कोथरुड : चांदणी चौक येथे चालू असलेल्या उड्डाणपूलाच्या कामा शेजारील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ लगत असणाऱ्या झिनीया, रामनदी , फ्लेमिंगो , कुणाल बेलेजा ह्या सर्व सोसायट्यांच्या प्लॅनची मंजूरी राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ लगतच्या १२ मीटर सर्व्हिस रस्त्यावर करण्यात आलेली आहे. मात्र हा रस्ता अद्यापपर्यंत झालेला नसल्याने नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे येथील रस्त्याचे काम तातडीने करावे अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी दिला आहे. Provide services road for the convenience of the citizens immediately, otherwise we will start a Rasta Rocco agitation: Dilip Vedepatil

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ रोजी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीच्या वेळी याबाबत सूचना दिलेल्या आहेत, तसेच माझ्याकडून ही याबाबत वारंवार पत्र व्यवहार करूनही १) रामनदी सोसायटी ते झिनीया सोसायटी २) झिनीया सोसायटी ते चांदणी चौक ३) चांदणी चौक ते डुक्करखिंड (पावनखिंड) हे १२ मीटर चे सर्व्हिस रस्ते लवकर होणे आवश्यक असताना देखील अद्याप काम झालेले नसल्याचे वेडे पाटील यांनी सांगितले.



या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी रस्ता उपलब्ध नसल्याने या परिसरातील ५०० ते ७०० सदनिका धारकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे रस्ते लवकरात लवकर संबधित विभागाने कार्यवाही करावी अन्यथा मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन प्रकल्पीय अधिकारी कार्यकारी अभियंता इंद्रभान रनदिवे, एन.सी.सी. चे कनिष्ठ अभियंता श्रीनिवास व कंत्राटदार किशोर भरेकर यांना रस्त्याच्या पाहणी दरम्यान वेडेपाटील यांनी दिले आहे.
सदर प्रसंगी या परिसरातील आशा नाथ, मनीष देव, माजी सैनिक सतीश गोडबोले, राजविंदर कथपाल, विजय फडके, मिलिंद चिटनीस, मंगेश नारखेडकर, सागर मसुरकर, अविनाश कुलकर्णी, विलास जहागीरदार, राहुल नगरकर, हेमंत परांजपे, राजाराम सोनटक्के, प्रवीण हेबारे, मुकेश गुप्ता, नवनीत दोडिया, अतुल देव, मकरंद भानेज आदि नागरिक उपस्थित होते.



