पुणे शहर

पुणे भाजपा सहकार आघाडीच्या वतीने मोफत कायदेशीर सल्ला केंद्र सुरू

पुणे : भारतीय जनता पार्टी , सहकार आघाडी पुणे शहराच्या वतीने आज ” मोफत कायदेशीर सल्ला केंद्र सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. pune Co-operative Front launches free legal advice center

सर्वसामान्य पुणेकरांसाठी दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भारतीय जनता पार्टी , पुणे शहर कार्यालय येथे हे मोफत कायदेशीर सल्ला केंद्र सुरू राहणार आहे . मान्यवर अभ्यासू कायदेपंडीतांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. गृहरचना सोसायट्या , नागरी पतसंस्था, सहकारी बँका यासोबत कौटुंबिक आणि इतर योग्य विषयावर मोफत सल्ला दिला जाणार आहे .

पुणे शहरात गृहनिर्माण संस्था ह्या १७९८४ इतक्या असुन फक्त २४८२ संस्थांनी डीम्ड कन्व्हेअन्स करून घेतले आहे . २१२५ गृहरचना संस्थाना डीम्ड कन्व्हेअन्स लागु होत नसले तरी बाकी बऱ्याच हजार संस्थांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि यासाठी भाजपा सहकार आघाडी आपल्याला मदत करेल . पुणेकरांनी या समाजोपयोगी उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जगदिश मुळीक यांनी केले आहे .

IMG 20210131 WA0061

पुणे शहर कार्यालय येथे हे मोफत कायदेशीर सल्ला केंद्र चालणार आहे . यासाठी सहकार आघाडी पुणे शहर यांनी तयार केलेल्या लिंकवर आपल्याला आपल्या संस्थेची अथवा वैयक्तिक माहिती , अडचणी यांची माहिती पाठवायची आहे . ती लिंक सोशलमिडीयाच्या विविध माध्यमातुन पुणेकरांपर्यत पोहचविणार असल्याचे सहकार आघाडीचे अध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांनी सांगितले .

याप्रसंगी संघटन मंत्री रवी अनासपुरे,  संघटन सरचिटणीस राजेश पांडे , सरचिटणीस गणेश घोष , राजेश येनपुरे , प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे , युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्यासह नगरसेवक , शहर पदाधिकारी , सहकार आघाडीचे पदाधिकारी आणि विविध आघाडयांचे अध्यक्ष उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे संयोजन भाजपा सहकार आघाडी अध्यक्ष सचिन दशरथ दांगट पुणे शहर यांनी केले होते .

IMG 20210128 WA0172

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये