पुणे शहर

कामगार दिनी पुणे अग्निशामक दलातील जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान

पुणे :  1 मे 2026 रोजी कामगार दिनानिमित्त आणि जागतिक अग्नीशमन सप्ताहा निमित्ताने अग्निशामक दलातर्फे शौर्य वीर जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.जवानांना शौर्य पुरस्कार काँग्रेस नेते राजाभाऊ मगर,राजाभाऊ साठे, माजी मुख्य अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी 1) वरिष्ठ कार्यकर्ते श्री. प्रसाद वि. नाईक (फायरमन, अग्निशामक केंद्र – कोथरुड) 2) प्रभारी तांडेल श्री. नितीन मा. घुले (फायरमन, अग्निशामक केंद्र – कोथरुड) 3) फायर इंजिन ड्रायव्हर श्री. रमेश गायकवाड (फायरमन, अग्निशामक केंद्र – कोथरुड) 4) फायरमन श्री. संजय महाले (फायरमन, अग्निशामक केंद्र – कोथरूड) 5) फायरमन श्री. संतोष भोसले (फायरमन, अग्निशामक केंद्र – कोथरूड) 6) मदतनीस जवान श्री. अनिकेत उत्तेकर (फायरमन, अग्निशामक केंद्र – कोथरूड) 7) प्रभारी उप अधिकारी श्री. प्रमोद मरळ (अग्निशामक केंद्र, – वारजे) 8) फायरमन श्री. बाबु शितकल (अग्निशामक केंद्र, वारजे) 9) सॅनेटरी इन्स्पेक्टर श्री. दत्तात्रय दळवी ( आरोग्य कार्यालय) 10) मुकादम श्री. वैजनाथ गायकवाड युवा नेते (आरोग्य कार्यालय) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Img 20260222 wa00062703742043808105024

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, तसेच प्रमुख पाहुणे पुणे महापौर मंजुषा नागपुरे.कार्यक्रमास विशेष उपस्थिती माजी आमदार चंद्रकांत मोकाटे,कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शन नगरसेवक पृथ्वीराज सुतार,नगरसेवक दिनेश माथवड, नगरसेविका वासंती नवनाथ जाधव, नगरसेविका जोत्स्ना कुलकर्णी,नवनाथ जाधव,माजी नगरसेवक योगेश मोकाटे, माजी नगरसेवक किशोर शिंदे उपस्थित होते.

Img 20260504 wa00773920403540469014696

जवानांना शौर्य पुरस्कार राजाभाऊ मगर (काँग्रेस नेते / कोथरुड विधानसभा) राजाभाऊ साठे (काँग्रेस नेते / कोथरुड विधानसभा)प्रशांत रणपिसे (माजी मुख्य अग्निशामक अधिकारी, पुणे म.न.पा. )यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी भा.ज.पा. युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, प्रथमेश नाईक, वेदांत नाईक, पै. अमर गायकवाड यांनी पार पाडली. तसेच मुख्य अग्निशामक अधिकारी देवेंद्र पोटफोडे, प्रविण बढेकर, सचिन कुलथे, सुभाष सणस,नंदूशेठ विर,बळीराम गुंड, सुनिल मारणे, उमेशराव नाईक, रामेश्वर कुमावत यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच विशेष आभार अरुणा नाईक यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये