पुणे शहर

PUNE METRO : नियमित धावणार मेट्रो; ‘हे’ असणार तिकीट दर

पुणे : बहुप्रतिक्षित पुणे मेट्रोचे (Pune Metro) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) त्यांच्या हस्ते रविवारी (दि.6) उद्घाटन होणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर त्याच दिवसापासून वनाज (Wanaj) ते गरवारे (Garware) आणि पिंपरी – चिंचवड (Pimpri-Chinchwad) ते फुगेवाडी (Phugewadi) हे मार्ग व्यावसायिक तत्त्वावर सुरु करण्यात येणार आहे. या मार्गावरील कमीत कमी तिकीट 10 रुपये व जास्तीत जास्त 20 असेल. तसेच परतीचे तिकीट पाहिजे असेल तर त्यासाठी 30 रुपये शुल्क द्यावे लागेल. 

पुणे मेट्रो (Pune Metro) सकाळी 7 वाजता सुरु होईल आणि रात्री 9 वाजता थांबेल. प्रत्येक मार्गावर 27 फेऱ्या होणार आहेत. ज्यांचे 100 तासांचे मेट्रो ड्रायव्हिंग पूर्ण झाले आहे, असे प्रशिक्षित चालक दोन्ही मेट्रोला असणार आहेत. त्यांना 8 तासांची ड्युटी आहे. ताशी 80 किमी या वेगाने प्रवाशांना नेण्याची महामेट्रोला (Mahametro) रेल्वे सुरक्षा व दक्षता आयुक्तांची (Railway Safety and Vigilance Commissioner) परवानगी मिळाली आहे. प्रत्येक स्थानकात मेट्रो 20 व गर्दीच्या ठिकाणी 30 सेकंद थांबेल. मेट्रोचे दरवाजे आपोआप बंद होणारे असून दरवाजे बंद झाल्याशिवाय मेट्रो धावणार नाही.

Fb img 1646482468176

प्रवाशांची करण्यात येणार मदत

सुरुवातीच्या काही दिवसांसाठी महामेट्रो प्रत्येक स्थानकात प्रवाशांकरता एक हेल्पिंग पॉईंट करणार आहे. तसेच प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थानकात व डब्यातही एक कर्मचारी असणार आहे. तिकीट कुठे काढायचे, दोन मजली स्थानकात केव्हा, कुठे आणि कसे जायचे याबाबत हे कर्मचारी प्रवाशांना मार्गदर्शन करतील. सर्व स्थानकांची तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असणारी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. स्थानकाला तांत्रिकदृष्ट्या चढण्या उतरण्यासाठी दोन्ही बाजूंना किमान तीन प्रकारच्या सुविधा असणे आवश्यक आहे. यातील साधा जिना आणि सरकता जिना सर्व स्थानकांवर कार्यान्वित करण्यात आला आहे. लिफ्टचे कामही बहुतांश ठिकाणी झाले आहे.

कुठे मिळणार तिकीट

पहिल्या मजल्यावर तिकीट घर असणार आहे.
तिकीट काढल्यानंतरच दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या जिन्यावर किंवा लिफ्टमध्ये प्रवेश मिळणार आहे.तिकीट नसेल तर दुसऱ्या मजल्यावर जाता येणार नाही. याच मजल्यावर खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तूंचे विक्री स्टॉल असतील.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

दुसऱ्या मजल्यावर मेट्रोचा प्लॅटफॉर्म (Metro Platform) आहे. सध्या तीनच डब्यांची मेट्रो आहे.
फलाट मात्र सहा डब्यांच्या अंतराचा करण्यात आलेला आहे. पहिल्या मजल्यावरुन स्थानकाच्या दोन्ही बाजूंना जाता येता येणे शक्य आहे. दुसऱ्या मजल्यावर मात्र त्यासाठी मनाई आहे. स्थानकातील प्रवेशासाठी सध्या तरी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

Fb img 1646482488598

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये