महाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्रासाठी सुप्रीम कोर्टातील आज महत्वाचा दिवस; सत्ता संघर्षासोबतच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकां बाबत सुनावणी

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज महत्त्वाचा दिवस आहे. राज्यातील सत्ता संघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुनावणी आजपासून पुन्हा सुरू होणार आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात नवी तारीख काय असणार याचे उत्तर मिळणार आहे. राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने ही महत्त्वाची दोन प्रकरणे सुप्रीम कोर्टासमोर येणार असल्याने राज्याचे लक्ष आज सुप्रीम कोर्टाकडे लागले आहे.

Img 20221228 wa000128129390617609791042356

मागील वर्षी जून महिन्यापासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात तत्कालीन एकसंध शिवसेनेत मोठे बंड झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली. तेव्हापासून राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. सत्ता संघर्षाची सुनावणी होळीच्या सुट्टी आधीच संपवण्याचा घटनापीठाचा इरादा होता. पण युक्तिवाद लांबल्यामुळे ती पूर्ण होऊ शकली नव्हती. आज पुन्हा शिंदे गटाच्यावतीने युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या युक्तिवादावर रिजॉइंडर करण्यात येईल. त्यामुळे आजच्या युक्तिवादानंतर आणखी किती दिवस युक्तिवाद सुरू राहील, हे घटनापीठाकडून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य ज्या याचिकेवर अवलंबून आहे, त्याबाबत सुनावणी वारंवार पुढे जात आहे. मागच्या वेळी सुप्रीम कोर्टाने 14 मार्चची तारीख निश्चित केली होती. पण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याच अध्यक्षतेखाली न्यायपीठासमोर दोन्ही सुनावणी होणार आहेत. त्यामुळे स्थानिक निवडणुकांबाबतची सुनावणी होणार नसल्याची दाट शक्यता आहे. सकाळच्या सत्रात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मेन्शनिंग होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतरच सुप्रीम कोर्ट पुढील तारीख देण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये