पुणे शहर

पुणे महापालिकेने जेष्ठ नागरिकांच्या मोफत क्ष-किरण तपासण्या पुन्हा सुरू कराव्यात : पृथ्वीराज सुतार

गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा

पुणे : pune city पुणे महापालिकेमार्फत क्रस्ना डायग्नोस्टीक्स कडून कमला नेहरू रूग्णालय व कै. जयाबाई सुतार दवाखाना कोथरूड येथे शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या क्ष-किरण तपासण्या मोफत आरोग्य तपासणी योजने अंतर्गत करण्यात येत होत्या, मात्र या तपासण्या आता बंद करण्यात आल्याने जेष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. महापालिकेने पुन्हा या मोफत तपासण्या सुरू कराव्यात अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी दिला आहे.

सुतार यांनी म्हंटले आहे की, ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या क्ष-किरण तपासण्याचा फार मोठा फायदा पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांना होत होता. परंतु पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागमार्फत २० जून २०२२ रोजी लेखी पत्राद्वारे क्रस्ना डायग्नोस्टीक्स सेंटरला सांगण्यात आले की, आपण फक्त पॅथालॉजीच्या तपासण्याच मोफत कराव्यात व क्ष-किरण तपासण्या मोफत करू नयेत. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठी अडचण व गैरसोय झाली आहे.

या संदर्भातील पत्र पृथ्वीराज सुतार यांच्या वतीने पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांना दिले आहे.

या प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिक मोठया प्रमाणावर तक्रार करीत आहेत. हा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांवरती
अन्याय करणारा आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच क्ष-किरण तपासण्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्वरीत मोफत सुरू कराव्यात अशी आमची शिवसेनेची मागणी असून ती पूर्ण न केल्यास शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याने तीव्र आंदोलन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या दालनात करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी आरोग्य विभागाची राहील, असा इशारा पृथ्वीराज सुतार यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये