पुणे शहर

पुण्यात 18 मे पासून पाणीकपातीचा  महापालिकेचा निर्णय; दर आठवड्यातील ‘या’ दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार….

पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने  दि. 18 मे पासून आठवडयातून दर गुरूवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहेत. पाऊस चांगला झाल्यास अडचण येणार नाही. पाणी कपातीबाबत पुणे महानगरपालिका प्रशासनाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा केली असून उपाययोजनाबाबत त्यांना माहिती देण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 18 मे पासून आठवडयातून दर गुरूवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहेत. याबाबत मनपा प्रशासनाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना माहिती दिली आहे.

20 ठिकाणी एअर व्हॉल्व बसवले आहेत त्यामुळे दुसर्‍या दिवशी कमी दाबाने पाणी मिळते ही समस्या कमी होणार आहे.
आगामी काळात पाऊस कमी पडला तर अत्यावश्यक प्लॅनिंग मनपा प्रशासन करीत आहे.आजूबाजूच्या गावातून टँकर आणता येतील तसेच टँक बंद ठेवता येतील. मुळशीमधून 5 टीएमसीची मागणी केली आहे. शासनाने एक सदस्यीय समिती नेमली होती. त्यांचा पाठपुरवठा सुरू असल्याची माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली आहे.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये