पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने यावे – शहराध्यक्ष जगदीश मुळीक.

पुणे : उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, पुणे मेट्रो चे लोकार्पण, ई बसेस चे लोकार्पण व नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन अश्या विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यनिमित्ताने एम आय टी कॉलेज मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार असून सदर सभा सर्वांसाठी खुली आहे. पुणेकरांना मोदीजी यांचे विचार ऐकण्याची संधी असून सर्वांना ह्या पुणे मनपा आयोजित कार्यक्रमात येण्यासाठी शहर भाजप च्या वतीने आमंत्रित करत आहोत असेही जगदीश मुळीक यांनी सांगितले.
नागरिकांनी सकाळी 10 पूर्वी सभास्थानी पोहोचावे असे आवाहन त्यांनी केले आहे. कर्वे रस्ता सकाळी 10 वाजता वाहतुकीसाठी बंद होणार असला तरी पर्यायी मार्ग उपलब्ध असून नागरिक अलका टॉकीज चौकातून , लालबहादूर शास्त्री मार्गाने, सेनादत्त पेठ येथून म्हात्रे पूल, गुळवणी महाराज पथ मार्गे करिष्मा सोसायटी चौकातून सभास्थानी पोहोचू शकतात. पण नागरिकांनी वेळेपूर्वी प्रवास केल्यास ते विना अडथळा सभास्थानी पोहोचू शकतील असे आवाहन भाजप शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक यांनी केले आहे.







