महाराष्ट्र

Pune News : पुणे स्टेशन ते बोरीवली मार्गावर आता ‘शिवाई’ बससेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून पुणे स्टेशन ते बोरीवली (सायनमार्गे) या मार्गावर ‘शिवाई’ ही वातानुकूलित बससेवा प्रवाशांच्या मागणीवरून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बस सेवा शिवाजीनगर आगारातून संचालित करण्यात येणार आहे. पुण्याच्या पुर्व भागातील नागरिकांची यामुळे मोठीच सोय होणार आहे. या भागातील नागरिकांना बोरीवलीला जाण्यासाठी अनेकदा स्वारगेटचा पर्याय वापरावा लागत होता.

पुणे स्टेशन-चिंचवड-सायन मार्गे बोरीवली असा या बससेवेचा मार्ग असणार आहे. सकाळी सहा, सात, आठ आणि नऊ वाजता, तर दुपारी एक, दोन, तीन वाजता; तसेच सायंकाळी चार वाजता या बसच्या फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार या सेवेत वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे.

पुणे स्टेशन बसस्थानक, वल्लभनगर, चिंचवड स्टेशन, निगडी या ठिकाणांहून आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय प्रवासी एमएसआरसीटीसी मोबाइल ॲप व किंवा https://npublic. msrtcors.com या संकेतस्थळावरून ऑनलाइन आरक्षण करू शकतात, अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी केले आहे.

‘शिवाई’ वातानुकूलित बस सेवा सुरक्षित, आरामदायी आणि वेळेची बचत करणारी असल्याने प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. पुणे स्टेशन येथून बोरीवली, पालघर, तलासरी, डहाणू, सिल्वासा या भागात जाण्यासाठी बससेवा असावी अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये