महाराष्ट्र

धक्कादायक बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन….महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. या अपघातात त्यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.

बारामती विमानतळावर विमान लँडिंग दरम्यान हा अपघात घडला असून घटनास्थळी प्रशासन, रेस्क्यू आणि आपत्कालीन सेवा काम करत आहेत. महाराष्ट्रासाठी ही धक्कादायक बातमी असून या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक हरहुन्नरी नेता गमावला आहे.

अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, आणि खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार हे सर्व दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी असून ते आता दिल्लीवरून बारामतीच्या दिशेने निघालेले आहेत.

अपघात घडल्यानंतर विमान जळून खाक झाले आहे. अजित पवार यांच्या अकाली मृत्यूमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आणि पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कार्यकर्त्यांना आश्रु अनावर झाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहेत.

Img 20260128 wa01627128372178461314041

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये