भाजप युवा मोर्चा शहराध्यक्षपदी राघवेंद्र मानकर

पुणे : भारतीय जनता युवा मोर्चाच्या पुणे शहर अध्यक्षपदी राघवेंद्र मानकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राघवेंद्र मानकर यांना दिले आहे.
यावेळी राघवेंद्र मानकर म्हणाले, माझे नेते पुण्यनगरी चे लाडके खासदार आदरणीय गिरीश बापट यांच्या आशीर्वादाने तसेच प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत पाटील, कसबा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मुक्ता टिळक, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत दादा पाटील, पुणे शहरातील पक्षातील सर्व जेष्ठ नेते आणि मार्गदर्शक यांच्या सहकार्याने मिळालेली ही जबाबदारी मी पूर्ण ताकदीने पार पाडेल.
युवा या शब्दाला उलट वाचलं तर वायु शब्द तयार होतो. शहरातील युवा मोर्चाच्या सर्व आजी माजी सहकार्यांच्या सोबतीने वायु वेगाने येणार्या काळात युवा मोर्चा काम करेल. युवकांना आश्वासक असे वातावरण मी सगळ्यांच्या साथीने नक्की तयार करेन अशी मी आपणास आज ग्वाही देतो.
माझ्या या सर्व प्रवासात मला साथ देणार्या प्रत्येकाचे आज मी आभार मानतो या पुढेही आपण असेच माझ्या कामाची ऊर्जा बनून सोबत द्याल ही मला खात्री आहेच. अशा शब्दात मानकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.



