पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालय अखेर पर्यटकांसाठी उद्यापासून सुरू होणार..

पुणे :- पर्यटकांची प्राणी संग्रहालयाला भेट देण्याची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. उद्यापासून पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले होणार आहे. २ वर्ष ५ दिवसांनी अखेर प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले होत आहे. दोन डोस घेतलेले असतील तरच प्राणी संग्रहालयात प्रवेश मिळणार आहे.
प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून सगळी तयारी पूर्ण झाली आहे. मागील अनेक महिन्यांपासून पर्यटक याची वाट पाहत होते. आता पर्यटकांची प्रतीक्षा संपली असून उद्यापासून प्राणीसंग्रहालय सुरळीत सुरू होणार आहे. प्राणी संग्रहालयात आता बीग कॅट यामध्ये बिबट्या त्याचबरोबर शेकरू, तरस, चौशिंगा आदी प्राणी असणार आहेत. याआधी काही कारणास्तव या प्राण्यांचे दर्शन पर्यटकांना होत नव्हते. ते आता होणार आहे.
खुले होणारे प्राणीसंग्रहालय अधिक वेगळ्या आणि चांगल्या अनुभवाचे असणार आहे. पर्यटकांना नवा अनुभव आता घेता येणार आहे. एवढेच नव्हे तर वाघ, सिंह, बिबट्या, हरीण, गवा, लांडगा, कोल्हा, अस्वल, हत्ती तर चौशिंगा, तरस आदी विविध प्राणी पर्यटकांना पाहता येणार आहेत. तर आगामी काळात झेब्रा आणि इतर काही प्राणी आणण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यासाठी निविदा काढली जाणार आहे.




