कर्वेनगर, कोथरुड भागातील रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रुपयांची मदत ; माजी नगरसेवक उज्वल केसकर यांचा मदतीचा हात

पुणे :कोरोना काळात रिक्षाचालकांच्या खात्यात रुपये १५०० जमा करण्याचे राज्य सरकार ने मागच्या महिन्यात जाहीर केले होते. परंतु अद्याप पर्यंत हे रूपये जमा झाले नाही. त्यामूळे खासदार गिरीश बापट यांच्या सूचनेनुसार कर्वेनगर, कोथरूड एरंडवणा येथील रिक्षा चालकांना प्रत्येकी १५०० रुपये देण्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी माजी नगरसेवक उज्वल केसकर, आपला परिसरचे अध्यक्ष विध्येश रामदासी, श्रीराम कंठोले, अशोक तिवारी,नारायण जयसंगपुरे,सदाशिव निवसे यादी उपस्थित होते.नुकतेच खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्या मानधनातून सुमारे ३८० रिक्षा चालकांना १५०० रुपये दिले आहेत.

केसकर म्हणाले, कोरोनो काळात रिक्षा चालकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामूळे त्यांना तातडीने मदत मिळायला हवी. या हेतूने खासदार गिरीश बापट यांच्या सूचनेनुसार कर्वेनगर, कोथरुड भागातील रिक्षा चालकांना प्रत्येकी १५०० रूपये मदत करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.






