पुणे शहर
तुषार भोसले हे भामटं पोरगं, वारकरी नाही : रुपाली पाटील

पुणे : “वारकरी संप्रदायात तुषार भोसले नावाचं भामटं पोरगं आलं आहे. ते स्वत:ला वारकरी समजतात, पण ते वारकरी नाही आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायाला कुठेतरी गालबोट लागत आहे. भाजपच्या चोरट्या, अविचारी आणि धुर्त राजकारणी या लोकांना कोणीही आपल्या क्षेत्रात घेऊ नका. हे आपल्या क्षेत्राचं वाटोळं करून, माता बहिणींमध्ये झुंज लावण्याचं काम करतात,” असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली-पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केले आहे.
रुपाली-पाटील ठोंबरे म्हणाल्या, सुषमा अंधारेंनी शिवसेनेत ( ठाकरे गट ) प्रवेश करून पाच महिने झाले. त्यांचे व्हिडीओ, ते फार जुने आहेत. तेव्हा वारकरी समाज आणि ह.भ.प महिला कुठे होत्या. हे वारकरी समाजाचे नसून शिंदे आणि भाजपने तयार केलेले आहेत. कारण, शिंदे गट आणि भाजपचा भांडाफोड सुषमा अंधारेंनी केला आहे,”
