महाराष्ट्रराजकीय

आधी म्हणाले, कुछ मिला क्या…मग खासदार राऊताचं पुष्पा स्टाईल ट्विट

मुंबई : संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay raut) यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. राजकीय सूडबुद्धीने ईडीची कारवाई सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. कुछ मिला क्या… कुछ मिला क्या? असा हा खेळ सुरू आहे, असे राऊत म्हणाले आहेत. त्यानंतर राऊतांनी केलेले ट्विटही चर्चेत आले आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्यावर एक हजार 34 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. ईडीच्या पथकाने प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी झडती घेतली आहे. त्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी नेले. चौकशीस सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केली. सुजीत पाटकर यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. सुजीत पाटकर हे संजय राऊत यांच्या मुली पुर्वशी आणि विधिता यांच्या कंपनीतील एक भागीदार आहेत. ईडीच्या या कारवाईवरून राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ईडी आणि केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेली ही कारवाई सहन 2024 पर्यंत सहन करू. त्यांना काय तपास करायचाय तो करू द्या, असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यानंतर राऊतांनी

पहले लालच दिया गया, ऑफर्स दिए । फिर डराया , धमकाया गया। तब भी झुका नहीं तो परिवार को धमकाया गया।
हमने कहा- छोड़ दो, नजरअंदाज करो इन्हें, जाने दो। तो अब सेंट्रल एजेंसी को हमारे पीछे लगा दिया।
चलता है, 2024 तक चलेगा भी…
पर हम झुकेंगे नहीं !

असे ट्विट केले. हे ट्विटही सध्या चर्चेत आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये