महाराष्ट्र

संजय राऊतांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी; ED उत्तर देणार

मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश विशेष न्यायालयाने दिले होते.

मागील एक महिन्याहून अधिक काळ राऊत न्यायालयीन कोठडीत असून, ते आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. संजय राऊतांच्या याचिकेवर ईडी आपलं उत्तर सादर करणार आहे.

ईडीच्या कोठडीत असलेले संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात त्यांनी हा अर्ज दाखल केला. आता राऊतांच्या या जामीन अर्जावर सुनावणी होणार नसून मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला संजय राऊतांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार ईडी आपलं उत्तर सादर करणार आहे.

Img 20220913 wa00104794122568839944278

राऊत यांच्या वतीने ॲड. विक्रांत साबणे यांनी पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याची मागणी केली होती; मात्र पुढील आठवड्यातील व्यस्त कार्यामुळे जामीन अर्जावर तातडीने सुनावणी होणार नाही, असे विशेष न्या. एम. जी. देशपांडे यांनी स्पष्ट केले होते. त्यावर ईडीच्या वतीने ॲड. कविता पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी अवधी मागितला. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी आज निश्चित केली आहे. राऊत सध्या 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.

Img 20220910 wa0003

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये