पाच हजार तरुणांना सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपट दाखविणार- दीपक मानकर

चित्रपटाच्या खास शो चे सिटी प्राइड कोथरूडमध्ये आयोजन
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २३ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आपल्या प्रभागातील १० ते १६” वयोगटाच्या मुला-मुलींसाठी ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ या चित्रपटाचे दोन खास प्रयोग आयोजित करण्यात आले होते. यामध्ये जवळपास १००० मुलांनी या चित्रपटाचा आनंद घेतला. यावेळी परिसरातील पाच हजार तरुणांना हा चित्रपट दाखविणार असल्याची माहिती माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी दिली आहे.
यावेळी प्रयोगाचे आयोजक माजी उपमहापौर दीपक मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, दिग्दर्शक प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, सुनील अभ्यंकर आणि विनोद सातव उपस्थित होते.

दीपक मानकर म्हणाले, शिवाजी महाराजांचा इतिहास नविन पिढी पर्यंत पोहचविण्यासाठी प्रविण तरडे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नव्या पिढीने या छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून प्रेरणा घ्यावी यासाठी मी परिसरातील पाच हजार तरुणांना हा चित्रपट दाखविणार आहे.
हर्षवर्धन मानकर म्हणाले, स्वराज्य स्थापनेचा इतिहास चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या येणाऱ्या पिढीला माहीत व्हावा यासाठी या चित्रपटाच्या खास प्रयोगांचे आयोजन आम्ही केले आहे.






