पुणे शहर
रविंद्र गांधी यांची फेसकॉमच्या योग शिक्षक समुपदेशन कार्यकर्ता पदी निवड

पुणे : महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या फेसकॉम पुणे प्रादेशिक विभाग कार्यकारणीच्या शेष कालावधीसाठी रवींद्र गांधी यांची योग शिक्षक समुपदेशन कार्यकर्ता पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभाग कार्यालयात विशेष सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सचिन राऊत पुणे. यांची फेस्कॉम पुणे प्रा.वि.कायदे सल्लागार पदी नियुक्त.,रवींद्र गांधी पुणे [ कार्यकर्ता ] योग शिक्षक/समुपदेशन पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी अरुण रोडे-अध्यक्ष फेस्कॉम,चंद्रकांत महामुनी.अध्यक्ष पुणे बी.टी.निसळ-फेस्कॉम महा.व फेस्कॉम पुणे-कायदे सल्लागार यांची प्रमुख उपस्थिती होती.







