कोथरुड

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने चित्ररुपी माध्यमातून स्वच्छतेचा व पर्यावरण संरक्षणाचा संदेश..        

कोथरुड : पुणे महानगरपालिका, कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कलाकृती व चित्ररूपी माध्यमातून स्वच्छतेचा व पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी कोथरुड मधील विविध ठिकाणी भिंतींवर जनजागृतीपर चित्रे साकारण्यात आली आहेत.

स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत पुणे शहराला देशात प्रथम क्रमांक मिळावा यासाठी या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्ररूपी थीम्स प्रत्यक्षात भिंतीवर साकार करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली असून त्यात चित्रकला शाळा व महाविद्यालयातील चित्रकलेमध्ये पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांना व आर्टिस्ट कलाकारांना सहभागी करून घेण्यात आले आहे. ही स्पर्धा कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग क्रमांक १०, ११, १२ या तीनही प्रभागांमध्ये राबविण्यात आली.

Img 20220113 wa0196

या स्पर्धेत १) माझी वसुंधरा अभियान २) सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज  ३) स्वच्छता विषयक जनजागृती ४) कचरा वर्गीकरण  ५) प्लास्टिक बंदी ६) वॉटर प्लस व पर्यावरण जनजागृती आदी विषय  स्पर्धकांना देण्यात आले होते. त्या विषयाला अनुसरून स्पर्धकांनी भिंतीवर अप्रतिम चित्रे रेखाटली आहेत. सदर स्पर्धेअंतर्गत डहाणूकर कॉलनी, कोथरूड गावठाण, श्रावणधारा वसाहत, मयूर कॉलनी, मोरे विद्यालय, रामबाग कॉलनी, आयडियल कॉलनी, नविन समाविष्ट बावधन, जुने बावधन, भुसारी कॉलनी, शिक्षक नगर, एम.आय.टी. कॉलेज परिसर आदी भागातील भिंतींवर चित्रे रेखाटण्यात आली आहेत.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

या स्पर्धेंचे आयोजन महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.  या स्पर्धेतील  विजेत्यांना प्रथम क्रमांक २५०००/- द्वितीय क्रमांक रुपये १५०००/- तृतिय क्रमांक रुपने १००००/- रोख व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. सदर चित्रे रेखाटण्यासाठी लागणारे अनेक प्रकारचे रंग, ब्रश, थिनर इत्यादी लागणारे साहित्य महानगरपालिकेच्या खर्चातून पुरविण्यात आले.

सदर स्पर्धेमध्ये तक्ष्य अनिमेशन अँड आर्ट स्कूलचे चित्रकलेचे प्रा. रोहित चव्हाण, के. पी. आर्ट स्टुडिओ पुणेचे प्रा. कमलेश पाटील, विद्यार्थी जय मैड, निकिता चव्हाण, चित्रकार रुपेश पंडीत, हेंमत साखरे आदी स्पर्धकांनी भाग घेतला. तसेच विशेषतः डहाणूकर कॉलनीतील आरोग्य निरिक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे सेवक शरद वावळकर, मोटार सारथी अक्षय पेरला, जनवाणीचे समीर अजगेकर, जयश्री पाटील यांनी स्वतः देखील चित्रे चितारली.

Whatsapp image 2022 01 05 at 1. 18. 18 pm

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आरोग्य निरिक्षक वैभव घटकांबळे, हनुमंत चाकणकर, गणेश साठे, शिवाजी गायकवाड, संतोष ताटकर, गणेश चोंधे, नवनाथ मोकाशी, रूपाली शेडगे, प्रमोद चव्हाण, सतीश बनसोडे मोकादम अशोक खुडे, साईनाथ तेलंगी, अशोक कांबळे, विजय पाटील, अशोक कांबळे, सुनिल भोसले आदींनी परिश्रम केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये