मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात ‘शरद करंडक’ राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन नाटय अभिनय स्पर्धा

पुणे : Pune पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, पौडरोड, पुणे येथे संस्थेचे आधारस्तंभ पद्मभुषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेली ” शरद करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन नाटय अभिनय स्पर्धा मोठया उत्साहात पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यांनी विदयार्थ्यांच्या कलागुणांना अभ्यासाइतकेच महत्व आहे. संस्थेच्या माध्यामातून विदयार्थ्यांचे कलागुण जोपासण्यासाठी आवश्यक असणारी सर्व मदत केली जाईल असे आश्वासन दिले.

स्पर्धेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुक अभिनय, सांघिक प्रयोग, एकपात्री प्रयोग सादर केले. प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्त्री अत्याचार या विषयावर नाटक सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली व या नाटकाद्वारे त्यांनी एक संदेश दिला की स्त्री ही अबला नसून सबला आहे व तिच्यामध्ये अन्यायाविरूध्द लढण्याची क्षमता असते याचे उत्तम सादरीकरण केले.
उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. गंगाधर सातव म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा विकास होण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांनी त्याचा जरूर उपयोग करून घ्यावा. सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रसिध्द चित्रपट निर्माते, लेखक सुश्रुत भागवत, नाटय कलाकर किरण ढमाले व विकास साठे हे लाभले. सुश्रुत भागवत यांनी विदयार्थ्यांना नाटय व अभिनय क्षेत्रातील भविष्यकालीन संधींबाबत मार्गदर्शन केले.



बक्षिस वितरण कार्यक्रमास लीड मिडीया ग्रुपचे संचालक विनोद सातव हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी अभिनय क्षेत्रात संकटाचे रूपांतर संधीमध्ये कसे करायचे याबाबत प्रत्यक्ष आलेले अनुभव विदयार्थ्यांना सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. घाडगे साहेब यांनी स्पर्धेतील एकूण ८ विजयी विदयार्थ्यांना वैयक्तिक रोख रकमेचे बक्षीस दिले व संस्थेमार्फत विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून एक सांस्कृतिक विभाग निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला.
स्पर्धेचे सुत्रसंचालन डॉ. रूपाली शेंडकर, प्रा. अमृता मोरे व प्रा.स्मिता चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. वैशाली कदम यांनी मानले. सदर कार्यकमास विदयार्थी, विदयार्थ्यांचे पालक, महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.



