पुणे शहर

काळ्या जादूवर उपचारासाठी सहा लाखांची कबुतरे पुण्यातील घटना

पुण्यात दोन भोंदूबाबांवर गुन्हा दाखल

पुणे : सतत आजारी असणाऱ्या व्यक्तीला तुमच्यावर घटस्फोटीत पत्नीनेच काळी जादू केली असून त्यातून बाहेर पडण्यासाठी कबुतरे आणावे लागतील, असे सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन भोंदूबाबावर पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात कुतुबुद्दीन नजमी आणि हकिमुद्दीनराज मालेगावंवाला या आरोपींवर जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अबिझर जुझर फतेपुरवाला यांनी पोलीसांकडे फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी अबिझर यांचा भाऊ हुझेफा याचे 2010 मध्ये गुजरात मधील मुलीसोबत लग्न झाले होते. परंतु पत्नीपासून मूल होत नसल्याने त्यांचा 2017 मध्ये संमतीने घटस्फोट घेतला होता. चार महिन्यापूर्वी हुझेफा हा तापाच्यामुळे आजारी पडला होता. त्याला कोरोना झाले असेल या शंकेने कुटुंबाने त्याची चाचणी करुन घेतली असता त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर अनेकदा उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी धर्मगुरु सय्यदना सैफुदीन यांना मुलाची तब्येत ठिक होण्याकरता अल्लाकडे प्रार्थना करण्याची विनंती करण्याबाबत अर्ज देण्यास गेले होते. त्यावेळी त्यांना तिथे हकिमउद्दीन मालेगाववाला भेटला. त्यास हुझेफाच्या आजारपणाबाबत सांगितले असता त्याने मी तुमच्या घरी येऊन मुलास पाहतो असे सांगितले.

Img 20210116 wa0007

त्याप्रमाणे हकिमउद्दीन एका माणसाला घेऊन हुझेफा याचे घरी गेला. त्यावेळी त्याने मांत्रिक उपचार करुन हुझेफा याचे पत्नीचा फोटो पाहण्यास मागून ते पाहत त्याने दुसऱ्या दिवशी कुटुंबियांना भेटण्यास बोलवून हुझेफाचे पत्नीनेच त्याच्यावर काळी जादू केल्याचे सांगितले व त्यामुळे त्यास त्रास हाेत असल्याचे म्हणाला. तो मरणाच्या दारात असून त्याचा कधीही मृत्यू होऊ शकतो असे सांगून घरातील आणखी दोन जणांना काळया जादुचा त्रास होण्याची शक्यता आहे, असे देखील सांगितले. त्यावर उपचार करण्याकरता त्याने मुंबईत सैफी, महेल येथे जाऊन महागडी कबुतरे खरेदी करावी लागतील. ती कबुतरे काळी जादूची बला त्यांचे अंगावर घेतात, त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही असे सांगत चार कबुतरे खरेदी करण्यास सहा लाख 80 हजार रुपये मागितले. त्यामुळे हुझेफाचे वडिलांनी बॅंक खात्यातून पैसे काढून दिले.

1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020 scaled

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये