शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करावे : रवींद्र मिर्लेकर यांचे बाणेर सुसगाव येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

पाषाण : आपल्या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करावे असे मार्गदर्शन शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले. बाणेर सुसगाव येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते. Shiv Sainiks should act as CM’s representative: Ravindra Mirlekar’s guidance to activists at Baner Susgaon
यावेळी शिवसेनेचे कोथरूड संपर्कप्रमुख प्रीतम उपलप, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चांदेरे ,शहर प्रमुख संजय मोरे , उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे, विभाग प्रमुख संतोष तोंडे , अशितोष आमले, महेश सुतार , सुहास धनकुडे, ऋत्विक धनकुडे, ज्योती चांदेरे आदी उपस्थित होते.
रवींद्र मिर्लेकर म्हणाले, मुख्यमंत्री पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रावर गेल्या अनेक महिने सातत्याने संकटे येत आहेत या संकटांचा नेटाने सामना मुख्यमंत्री करत आहेत. शिवसैनिकांनी देखील आपल्या परिसरातील संकटांवर मात करण्यासाठी तयार राहिले पाहिजे. आपले मुख्यमंत्री घराघरात पोहचत आहे. आपल्या जनतेला काय अडचण आहे ते जाणण्याची गरज ओळखून कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून अडचणी सोडवाव्यात असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
या कार्यक्रमास बाणेर बालेवाडी पाषाण, सुतारवाडी, सुस म्हाळुंगे परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते.




