राष्ट्रीय

अयोध्येत योगींच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार, मथुरेतून प्रचाराचा नारळ फुटणार : संजय राऊत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्येत लढणार अशी चर्चा होत आहे. शिवसेना ही अयोध्येत आपला उमेदवार देणार आहे. मथुरेतून शिवसेना प्रचाराला सुरुवात करणार आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यूपीत 50 ते 100 जागा लढण्याचा विचार आहे, असंही ते म्हणाले.

आज राकेश टिकैत यांच्याशी भेटणार आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीबाबत त्यांचा कल जाणून घेणार आहे. त्यानंतर आम्ही कुठं लढायचं, किती जागांवर लढायचं हे ठरवणार आहोत, असं राऊत म्हणाले. आम्ही उत्तरप्रदेशच्या सर्व भागात 50 ते 100 जागांवर निवडणूक लढवणार आहोत. यावेळी शिवसेनेला उत्तर प्रदेशमध्ये आपलं आस्तित्व दाखवायचं आहे. मला खात्री आहे यावेळी आम्ही ज्या पद्धतीनं लढायचं ठरवलं आहे, त्यामुळं आमचे सदस्य उत्तरप्रदेश विधानसभेत असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. तर पंजाब, गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. उत्तरप्रदेशात पहिला टप्पा 10 फेब्रुवारी आणि दुसरा टप्पा 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे. तर तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा अनुक्रमे 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवार, 3 मार्च आणि 7 मार्चला पार पडणार आहे. निवडणुकांचे निकाल 10 मार्चला येणार आहे.

Whatsapp image 2022 01 05 at 1. 18. 18 pm
Img 20220108 wa0171

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये