पुणे शहर

राहुल सोलापूरकर विरोधात शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक; नाक घासून छत्रपतींची माफी मागितली पाहिजे अन्यथा कडेलोट करू – शहर प्रमुख संजय मोरे

पुणे : मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एका मुलाखती मधे बोलताना महाराजांची बदनामी करणारे व महाराजांच्या पराक्रमाची व्याप्ती व शौर्य कमी करणारे वक्तव्य केले होते, त्याविरोधात शिवसेना पुणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा स्मारक, कोथरूड गावठाण येथे अभिनेता राहुल सोलापूरकरच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राहुल सोलापूरकरच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले, त्याला पायदळी तुडवला. त्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच आंदोलन स्थळावरून सर्व शिवसैनिकांनी राहुल सोलापूरकरच्या घराच्या दिशेने मोर्चा वळविला आणि त्याच्या घरापर्यंत शिरून त्याच तोंड रंगवण्याचा प्रयत्न केला, यावेळी पोलिस प्रशासनाने ताकदीने अडविल्यामुळे शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांच्या घराखालीच ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Img 20240404 wa0017281298374058713843994116

यावेळी बोलताना शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सदर प्रकरणात अभिनेता राहुल सोलापूरकर वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. सरकार त्याला पोलीस संरक्षण का देत आहे ? तसेच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख न करता त्यांच्या पायावर नाक घासून माफी मागावी अशी मागणी केली. तरच माफी मिळेल अन्यथा शिवसेना पुन्हा तीव्र आंदोलन करून त्याचा कडेलोट करणार असल्याचे सांगितले.

या आंदोलनामधे पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख राजेश पळसकर, प्रशांत राणे, भरत कुंभारकर, मा नगरसेवक योगेश मोकाटे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, शहरसंघटक राजेंद्र शिंदे , संतोष गोपाळ, विलास सोनवणे, पराग थोरात, दिलीप पोमन, नितीन पवार, शिव आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, युवासेना शहर संघटक राम थरकुडे, सनी गवते, महिला सहसंपर्क संघटीका कल्पना थोरवे, छायाताई भोसले, जोती चांदेरे, करुणा घाडगे, सुनिता खंडाळकर, सोनाली जुनवणे, प्रज्ञा लोणकर, भारती भोपळे, युवासेनेचे परेश खांडके, गणेश काकडे, सोहम जाधव, वैभव दिघे, नीरज नभी, चिंतामण मुंगी, मयूर कोंडे, वैभव कदम, शिवसेना विभाग प्रमुख सुरज लोखंडे, संतोष तोंडे, भरत सुतार, हेमंत यादव, चंदन साळुंके, दिलीप व्यवहारे, अजय परदेशी, नंदू येवले, पुरुषोत्तम विटेकर, संतोष भुतकर, प्रसाद काकडे, अमित जगताप, मकरंद पेठकर, अनिल माझिरे, जगदीश दिघे, शिवाजी गाढवे, गिरीश गायकवाड, दिलीप जानवरकर, नागेश गायकवाड, संजय कोंडके, श्रीपाद चिकणे, प्रकाश चौरे, संजय साळवी, नितीन रावळेकर, बकुळ डाखवे, आकाश बालवडकर, नागेश खडके, ओंकार मारणे, राहुल शेडगे, संजय कोंडके, गणेश पोकळे, प्रणव आडकर इतर शिवसैनिक, शिवप्रेमी उपस्थित होते.

Img 20240404 wa0013281293529802052601663206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये