कोथरुड

श्री तुळजाभवानी माता व राधाकृष्ण सेवा संस्था कोथरूडच्या वतीने आदिशक्ती पुरस्कारांचे वितरण

कोथरूड: श्री तुळजाभवानी माता व राधाकृष्ण सेवा संस्था कोथरूड गाव मंदिराच्या वतीने नवरात्र उत्सव निमित्त आदिशक्ती पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या नारिशक्तींचा गौरव संस्थेच्या वतीने करण्यात आला.

जेष्ठ नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे, पार्श्वगायिका राजेश्वरी पवार, अभिनेत्री सानिया चौधरी, ऋतुजा सोमण, रूपा परभणीकर व वैशाली जाधव यांना आदिशक्ती पुरस्कार 2023 ने गौरविण्यात आले. सन्मान चिन्ह व पैठणी साडी प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला . यावेळी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच किरण पाटिल प्रस्तुत होम मिनिस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले.

यावेळी आयोजित लकी ड्रॉ स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.कोथरुडमधील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लकी ड्रॉ कुपन काढण्यात आली. टीव्ही, फ्रीज, शिलाई मशीन,ओव्हन, मिक्सर, इस्त्री, प्रेशर कुकर, पॅन आशा विविध 25 बक्षिसासह पैठणी साडीने विजेत्या महिलांना सन्मानित करण्यात आले. मोठ्या संख्येने व प्रचंड उत्साहात महिला भगिनींनी यावेळी स्पर्धेसाठी उपस्थिती लावली.

Img 20231022 wa00091895460304326442177

संगीत, नृत्य तसेच विविध खेळांमध्ये सहभागी होत महिला भगिनींनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी श्री तुळजाभवानी माता मंदिर व राधाकृष्ण सेवा संस्था मंदिराचे संस्थापक माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी प्रास्ताविक पर बोलताना सांगितले की धैर्य, सामर्थ्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर महिला भगिनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून कुटुंब, समाज तसेच राष्ट्र उभारणीत अमूल्य योगदान देत आहेत. अश्या महिला भगिनींचा सन्मान करून समाजातील इतर भगिनींना देखील प्रेरणा मिळावी या उद्देशाने आदिशक्ती पुरस्काराने या नारिशक्तींचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला आहे.

Img 20230717 wa0012281294517541507444836162
Img 20231019 wa00028359819733516444269

या वेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक प्रशांत बधे, दिलीप वेडेपाटील, दिलीप उंबरकर, सुनील महाजन,दिलीप दगडे पाटील, महेंद्र काळे, प्रमोद देशमुख, शिवाजी गाढवे, सुप्रभा काळे, संगीता पवळे, छाया भोसले, सविता वायकर, लता सोनवणे, भारती भोपळे, प्रज्ञा लोणकर, शीतल जाधव, शीतल दिघे, आदी उपस्थित होते. नवरात्र उत्सवाचे उत्सव प्रमुख माजी नगरसेवक ॲड. योगेश मोकाटे यांनी यावेळी उपस्थित महिला भगिनींचे व मान्यवरांचे आभार मानले.

Img 20230511 wa0002282292294772633607891151

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये