पुणे शहर

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून डॉ. कुमार सप्तर्षी यांना श्रद्धांजली..

अभ्यासू, संवेदनशील आणि निडर आवाज हरपला :  चंद्रकांत पाटील

पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते, गांधीवादी विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन डॉ. सप्तर्षी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी सप्तर्षी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

“डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनामुळे समाजमनाला दिशा देणारा एक अभ्यासू, संवेदनशील आणि निडर आवाज हरपला आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर समाजवादी विचारांची प्रामाणिकपणे जोपासना केली. त्यांच्या कार्याचा ठसा अनेक पिढ्यांवर कायम राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या तसेच असंख्य अनुयायांच्या दुःखात मी सहभागी असून, दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दांत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Img 20260222 wa00063491038201882637992

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये