आरोग्य

माझा कान..माझी जबाबदारी..
इअर फोन्सचे दुष्परिणाम व घ्यावयाची काळजी..

डाॅ.शंकर शिंदे
कान, नाक,घसा तज्ञ

आजकाल प्रत्येक जण मोबाईलचा वापर करतो. आजच्या काळातील एक गरजेचे असे हे साधन बनले आहे मोबाईल. आणि मोबाईलचा वापर करणाऱ्यांपैकी बरेच मंडळी बोलण्यासाठी म्हणा अथवा मनोरंजनासाठी गाणे/ संगीत ऐकण्यासाठी वापर करतात तो इअर फोन्सचा.

आज कोरोना संसंर्ग काळात तर शिक्षक शाळा पण ऑनलाईन आहेत. लहान मुले सुद्धा आज मोठ्या प्रमाणावर इअर फोन्सचा वापर करत आहेत.
एकाच घरात दोन/तीन लहान मुले आहेत, सकाळी घरातील आई वडील पण कोरोना मुळे घरातूनच काम करत असल्यामुळे एकमेकांना आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून इअर फोन्सचा वापर करत आहेत. पण सारखा इअर फोन्सचा वापर करणे खरच योग्य आहे का? का त्याचे काही दुष्परिणाम आहेत का?

चला तर मग कानाची रचना कशी असते ते समजून घेऊयात.

कानाचे प्रामुख्याने तीन भाग असतात. बाह्यकर्ण, मध्यकर्ण व आंतरकर्ण. 
बाह्यकर्ण म्हणजे कानाचा जो भाग आपल्याला दिसतो तो भाग.
मध्यकर्ण म्हणजे ह्या भागात कानातील छोटी छोटी हाडे असतात व ती हाडे एकमेकांना जोडून साखळी करून ती कानाच्या पडद्याला चिटकलेली असतात.
आंतरकर्ण भागात असतात त्या म्हणजे नसा व मज्जारज्जू.

ध्वनी तरंग कानाच्या पडद्यावर आदळतात तेव्हा पडद्यामागील हाडांची साखळी थरथरते व त्यामुळे आंतकर्णातील मज्जारज्जू हालतात व नसा उत्तेजीत होतात. या नसा मेंदूतील ठरावीक भागाला जोडलेल्या असतात व त्यामुळे मेंदूचा हा भाग उत्तेजीत होतो व या किल्ष्ट प्रक्रियेतुन आपण ऐकतो. ध्वनीतरंग यांना वेगवेगळी तरंग लांबी म्हणजेच फ्रिक्वेन्सी असते व आवाजाची मोजणी आपण डेसिबल या मापकानुसार करतो. जेवढा जास्त डेसिबल तेवढा जास्त मोठा आवाज.
मानवाची ऐकण्याची क्षमता ही 20 Hz ते 20000 Hz असते. आपले कान 2000 ते 5000 ह्या Frequency ला जास्त संवेदनशील असतात.

इअर फोन्सचे दुष्परिणाम टाळण्यासाठी चे उपाय

इअर फोन्सचे दुष्परिणाम
१) बहिरेपणा…आपण इअर फोन्स वापरताना बऱ्याच वेळा मोठा आवाज ठेऊन ऐकतो अथवा गर्दीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी आवाज स्पष्ट ऐकू येण्यासाठी आपण इअर फोन्सचा आवाज मोठा ठेवतो.
त्यामुळे कानाच्या पडद्यावर जोरात आवाज आदळतो व त्यामुळे आंतकर्णातील मज्जारज्जूंची Haircells जोरात हालचाल होते कालांतरणाने ते कमकुवत होतात व बहिरेपणा येण्याची शक्यता वाढते.
2)कानाला जंतूसंसर्ग होण्याची शक्यता इअर फोन्सच्या जास्त प्रमाणातील वापरामुळे वाढते.
3)  कानातील मळ साचण्याचे प्रमाण वाढते.
डोकेदुखीचा आजार वाढणे, मळमळ होणे,चक्कर येणे, कानात नेहमी आभासी Tinnitus आवाज येणे.

इअर फोन्सचे दुष्परिणाम टाळण्यासाठी चे उपाय

लहान मुलांनी शक्यतो ऑनलाईन शाळे दरम्यान स्पीकरचा वापर करावा अथवा इअर फोन्सचा आवाज कमी ठेवावा व पालकांनी ह्याची योग्य ती खबरदारी घ्यावी.
इअर फोन्सचा वापर करणे आवश्यक असल्यास कमी आवाजात वापर करावा.
इअर फोन्स वापरण्याच्या कालावधी मध्ये दर एक तासाने दहा ते पंधरा मिनिटांचे अंतर ठेवावे.
हालक्या दरज्याचे अथवा दुसर्‍यांचे इअर फोन्स वापरणे टाळावे.
कानावर लावायचे ( Over The ) Head Phones  वापरावेत.

Noise Cancellation
Headphones   चा वापर करावा.
अशा पद्धतीने आपण आपल्या कानांची काळजी घेणे आवश्यक आहे.नाहीतर इअर फोन्सचे दुष्परिणाम दिसून येतील..

Img 20210116 wa0007
1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020 scaled

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये