पुणे शहर

तर दुसऱ्या दिवशी पासूनच कठोर निर्बंध लावले जातील ; अजित पवार

पुणे:  10 सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू होत
आहे. नागरिकांनी साधेपणाने घरगुती गणेशोत्सव
साजरा करावा पण, कोरोना संकट टळले नसल्याने मोठ्या गणपती मंडपात पहिल्या दिवशी गर्दी वाढलेली दिसली तर दुसऱ्याच दिवशी पासून कठोर निर्बंध लावले जातील, असा इशारा राज्याचे  उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

अजित पवार यांनी आज पुण्यात आयोजित बैठकीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात व पुण्यात गणेशोत्सव मोठ्याप्रमाणावर साजरा होतो. कारोना संपलेला नाही त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळ मंडपात गर्दी होत कामा नये, पहिल्या दिवशी गर्दी दिसली तर दुसऱ्या दिवशी कडक निर्बंध लागू केले जातील असा सूचक इशारा त्यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना दिला आहे.

मोठ्या गणेशोत्सावासाठी मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करा. मोठे गणेशोत्सव साधेपणाने साजरे करावेत. निर्बंधा बाबत चर्चा झाली असली तरी कठोर निर्बंध लादणार नाही असेही पवार म्हणाले.

Paper design
Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये