पुणे शहर

इयत्ता ९वी ते १२चे वर्ग प्रायोगिक तत्त्वावर चालू करा – आमदार शिरोळे यांची मागणी

पुणे : कोविड प्रतिबंधक नियमांच्या पालनांचे कडक निर्बंध घालून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग प्रायोगिक तत्त्वावर चालू करावेत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.

कोविड साथ प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज ( शुक्रवारी )झाली. या बैठकीत आमदार शिरोळे यांनी विविध सूचना केल्या. गेली दोन वर्ष शाळा खुल्या केलेल्या नाहीत, त्याचे मानसिक परिणाम विद्यार्थी आणि पालकांवर होत आहेत. याचा अभ्यास  सरकारने करावा आणिइयत्ता आठवी ते नववीपर्यंतचे वर्ग प्रायोगिक तत्त्वावर चालू करावेत, अशी सूचना आमदार शिरोळे यांनी केली.

गेल्या महिन्यात शासकीय निर्बंध सैल केल्यावर राज्यातील अर्थचक्राला गती मिळू लागली आहे,परन्तु काही व्यावसायिक घटक मागेच राहिले आहेत, अशा घटकांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी प्रोत्साहनात्मक योजना आखाव्यात आणि त्यांना राज्य सरकारने हातभार लावावा असेही आमदार शिरोळे यांनी सुचविले. सर्वच घटकांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून अर्थचक्राला व्यापक गती द्यायला हवी, असे शिरोळे यांनी सांगितले.

Img 20210818 wa0002
Fb img 1630678566217 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये