पुणे शहरमहाराष्ट्र

जगताप व लांडगे समर्थकांची वर्णी काही नगरसेवक भाजपावर नाराज

आठ प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल

पिंपरी चिंचवड : पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या आठ प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले.आमदार लक्ष्मण जगताप व आमदार लांडगे यांच्या समर्थकांची पुन्हा वर्णी लागली आहे.

पालिकेतील भाजपच्या सुमारे चौदा नगरसेवकांना मागील चार वर्षात एकदाही कोणत्याही पदावर ती अद्याप घेतलेले नाही.यामुळे अशा चौदा स्थानिक नगरसेवकांचा एक वेगळा गट नकळत तयार झाला असल्याचे चित्र समोर येत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये 77 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहेत पालिकेवर सत्ता आल्यानंतर आमदार समर्थकांना वारंवार पदे देण्याचा प्रघात सध्यातरी रुढ झालेला पाहायला मिळत आहे.

पालिकेतील कारभारावर नाराज असलेले काही पदाधिकारी व गेले चार वर्षे कोणतेच पद न मिळालेले नगरसेवक राष्ट्रवादी व शिवसेनेच्या गळाला लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे नाव बदलून एल. जे.कार्पोरेशन करण्याचे बाकी असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या प्रमाणे भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद आहे . तशी ताकद पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नाही. यामुळे व्यक्तिनिष्ठ असणाऱ्या नगरसेवकांची वर्णी ही वारंवार पदावरून लागत असल्याची चर्चा पालिकेत होती.
आठही प्रभाग समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. यामुळे आठही प्रभाग समिती वरती नऊ तारखेला अध्यक्षांचे शिक्कामोर्तब होणार आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये