पुणे शहर

शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योती मेटे यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकी द्या ; पुणे शहराध्यक्ष भरत लगड यांची मागणी

पुणे : भाजपासोबत महायुतीत घटक पक्षात असणाऱ्या शिवसंग्राम संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योती मेटे यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकी द्यावी अशी मागणी पुणे शहर शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष भरत लगड यांनी केली आहे.

नुकतीच राज्यपाल नियुक्त १२ आमदार निवडीवर असलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली असल्याने आता आमदार निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच राज्यपाल कोट्यातील आमदार जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसंग्राम संघटनेकडूनही आता ज्योती मेटे यांना आमदार करावे या मागणीने जोर धरला आहे.

स्व विनायक मेटे यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी भाजपने डॉ ज्योती विनायक मेटे यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकी द्यावी अशी मागणी लगड यांनी केली आहे.
वयाच्या २१ व्या वर्षापासून स्व. विनायक मेटे हे समाजाच्या अनेक समस्या व प्रश्नांसाठी भांडत आहे आपले आयुष्य हे शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठीच खर्च केले, १४ ऑगस्ट रोजी मराठा समाजाची सरकारने बैठक आयोजित केली होती व यासाठी महाराष्ट्रातून सर्व समन्वयक बैठकीसाठी येणार होते. याच बैठकीला मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांवरती चर्चा होणार होती. या बैठकीला जात असतानाच विनायक मेटे यांचे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघातात निधन झाले होते. त्यामुळे स्व. विनायक मेटे यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी या मागणीचा विचार व्हावा असे भरत लगड यांनी म्हंटले आहे.

Img 20221228 wa00016208176808646242256

डॉक्टर ज्योती मेटे ह्या उच्चशिक्षित आहेतच त्याचबरोबर त्यांना शासन कामकाजाचा अनुभव देखील आहे. त्या स्वतः डॉक्टरही आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये मध्यंतरी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये देखील महाराष्ट्रात तसेच बीडमध्ये चांगले यश प्राप्त झाले आहे. म्हणुन भाजप पक्षाने आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांचा विचार करावा. भाजपाने डॉक्टर ज्योती मेटे यांना आमदार केले तर तीच खरी स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांना श्रद्धांजली राहील असे भरत लगड यांनी म्हंटले आहे.

Img 20230707 wa00097391429386569165714
Img 20230708 wa0003
Img 20230511 wa0002281296351682306326034196

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये