महाराष्ट्र

श्रीवर्धनमध्ये आढळली संशयित बोट; बोटीत सापडल्या तीन एके-४७ आणि कागदपत्रं!

पुणे : रायगडमध्ये समुद्रकिनारी एक संशयित बोट आढळली आहे. या बोटीमध्ये एके-४७ आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. रायगड पोलीस गस्त घालत असताना ही बोट आढळली आहे. या बोटीत एकही व्यक्ती सापडला नसून बोटीत तीन एके ४७ आढळल्या आहेत. तसेच अनेक कागदपत्रेही सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे.

या संदर्भात स्थानिक आमदार अनिकेत तटकरे यांनी हा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, ”आज सकाळी ही बोट सापडली असून या बोटीत तीन एके ४७ कागदपत्रे आणि अडीचशे जिवंत काडतुसे सापडली असल्याची माहिती आहे.”

Fb img 1660803986582
Fb img 1660745320845
Amrutmahotsav 600x600 1
Img 20220804 wa0019951227047229036961
Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये