पुणे शहर
कोथरूडमध्ये 13 वर्षीय विशेष मुलाचा खून.. मृतदेह पोत्यात गुंडाळून आढळला.

पुणे : कोथरूडमधील एकलव्य पाँलिटेक्निक कॉलेज मैदानात आज रात्री एका तेरा वर्षीय मुलांचा मृतदेह आढळल्याने कोथरूड मध्ये खळबळ उडाली आहे. या मैदानावर अनेक युवक खेळण्यासाठी येत असतात पण अचानक हा मृतदेह आढळल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
कोथरूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तेरा वर्षीय मुलगा दीव्यांग असुन तो कोथरूड मधील म्हातोबादरा या ठिकाणी राहायला होता. ज्यावेळी मॄतदेह सापडला त्यावेळी मुलाच्या अंगावर कपडे नव्हते. तो नग्न अवस्थेत असल्याने विविध शंका उपस्थित होत आहेत. कदाचित नरबळीची शक्यता नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास कोथरूड पोलिस करत आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.



