महाराष्ट्रराजकीय

इंदापूर तालुक्यातील कालवाप्रश्नी जयंत पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

पुणे: इंदापूर तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षते खाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पाटील यांनी इंदापूरात सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला तसेच समस्या जाणून घेतल्या. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते

खडकवासला कालवा व सर्व वितरकांची दुरुस्ती करण्याचे तसेच निरा डावा मूळ कालवा पूर्णपणे नव्याने वाढीव वहन क्षमतेचा करण्यासाठी सर्व्हे करून कालवा अस्तरीकरण व क्राँक्रिटीकरण करण्याचे अंदाजपत्रक तात्काळ शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

नीरा नदीवरील जांब, खोरोची, चिखली, वालचंदनगर, कुरवली, निमसाखर, निर निमगाव, पिठेवाडी व बोराटवाडी तसेच भिमा नदीवरील भाट निमगाव, टण्णू, नरसिंगपूर येथील केटीवेवर बंधारे दुरूस्ती, काँक्रीटीकरणासाठी अंदाजपत्रके तात्काळ कृ.खो.वि मंडळाकडे सादर करून निधी मंजूर करण्यात यावा असे निर्देश ही पाटील यांनी दिले आहेत.

शेटफळ हवेली तलावाची उंची वाढवण्याचे अपूर्ण काम व सांडवा वितरीकेचे अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेचे ५६०० हेक्टर क्षेत्रासाठी तात्काळ सर्व्हे करण्याचे आदेशही बैठकीत दिले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये