कोथरुड

१० हजार कुटुंबांना दिवाळीनिमित्त भेट वस्तूंचे वाटप

कोथरुड : दिवाळीचे औचित्य साधत ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्डच्या वतीने एरंडवणा गावठाण परिसरातील १० हजार कुटुंबांना दिवाळी भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्डचे महाराष्ट्र प्रेसिडेंट सनी निम्हण व स्नेहल निम्हण यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

देण्यात आलेल्या भेट वस्तूंमध्ये उटणे, पणत्या, उंबरा पट्टी व इतर दिवाळी साहित्याचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी फटाके मुक्त साजरी करा, हाताला सॅनीटायझर लावून फटाके पणत्या पेटवू नका, मास्कचा वापर करा असा संदेश या कार्यक्रमावेळी देण्यात आला.  

यावेळी विठाबाई निम्हण, रंजना रजपूत, आशा हडवळे, सीता रजपूत, अमित शिंदे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये