मनसेची पुणे शहराची कार्यकारणी जाहीर ; राज ठाकरेंचा कोथरूडचा शिलेदार सुधीर धावडेच…

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहराची कार्यकारणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहिर केली आहे. शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या नेतत्त्वाखाली दहा उपशहर अध्यक्ष, सचिव, शहर संघटक आणि विधानसभा अध्यक्ष,सचिव यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक चर्चा असणाऱ्या कोथरूड मतदारसंघाचे विधानसभा अध्यक्ष पदी सुधीर धावडे यांची फेरनिवड झाल्याने राज ठाकरे यांचा कोथरूड मधील शिलेदार सुधीर धावडे ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मनसेच्या नवीन कार्यकारणी ची पदाधिकारी वाट पाहत होते. गेल्या आठवड्यात मनसे शहर अध्यक्ष पदी वसंत मोरे यांची निवड करण्यात आल्यानंतर कार्यकारणी निवडीला वेग आला. उपशहर अध्यक्षपदी आशिष देवधर, सुहास निम्हण,कैलास दांगट, अनिल साळुंखे, अनिल राणे, हेमंत बत्ते, राहूल तूपेरे, जयराज लांडगे, अझरूद्दीन सय्यद, प्रशांत कनोजिया यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे शहर अध्यक्षपदी सुधीर धावडे यांचे नाव निश्चित मानले जात होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यां कडून ही याला दुजोरा दिला जात होता. मात्र ऐन वेळी पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनुभवाला महत्व देत वसंत मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
त्यानंतर सुधीर धावडे यांना कोथरूड विधानसभा अध्यक्ष पदावरून पायउतार करण्यासाठी पक्षातील काही जून्या जाणत्यांनी प्रयत्न सुरू केले. गेल्या दोन दिवसापासून धावडे या पदावर राहणार की नाही ? याची चर्चा रंगली होती. मात्र आज जाहिर झालेल्या कार्यकारणीच्या निवडी मध्ये धावडे यांची फेरनिवड झाल्याने अखेर राज ठाकरे यांचा कोथरूड मतदारसंघांतील शिलेदार सुधीर धावडे असल्याचे शिक्कामोर्तब झाले.
मनसे कार्यकारणी यादी-











