पुणे शहरराजकीय

आक्षेपार्ह ट्विटप्रकरण – भाजप पदाधिकाऱ्याला शिवसैनिकांचा दणका


पुणे : भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे व राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो टाकुन आक्षेपार्ह ट्विट केले होते .या प्रकारामुळे  पिंपरी-चिंचवड व भोसरीतील युवासेना पदाधिकारी व युवासैनिक आक्रमक झाले. व  त्याला शोधण्यासाठी त्याचे घर गाठत त्याला शिवसेना स्टाईलने दणका दिला.

याप्रकारानंतर त्या पदाधिकाऱ्याने  ट्वीटरवर माफी मागत माफीचा व्हिडीओ पोस्ट केला .  युवासैनिकांनी वाकड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून त्याला लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

याप्रसंगी समन्वयक मावळ लोकसभा जितेंद्र ननावरे ,
शिरूर लोकसभा जिल्हा प्रमुख सुरज लांडगे ‎,जिल्हा समन्वयक सचिन सानप , रुपेश कदम उपजिल्हा समन्वयक  कुणाल जगनाडे विधानसभा प्रमुख ,अजिंक्य उबाळे, अमित शिंदे विधानसभा चिटणीस, प्रतिक्षा घुले , निलेश हाके,  नितीन बोंडे ,प्रवीण पाटील , सागर शिंदे ,अनिकेत येरुंकर,गौरव आसरे,अविनाश जाधव,गणेश सस्ते व युवासैनिक उपस्थित होते.
युवासेनेचे मावळ लोकसभा विस्तारक राजेश पळसकर व शिरुर लोकसभा विस्तारक सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये